Bhalod News आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून भालोद येथे ‘गाव पातळीवर आधार व्हेरिफिकेशन शिबीर यशस्वी

यावल न्युज

यावलः रावेर-यावल विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व स्पष्ट निर्देशानुसार भालोद येथे निराधार योजनांसाठी आधार व्हेरिफिकेशन शिबीर गावपातळीवर यशस्वीरित्या पार पडले.

सदर उपक्रम मूळतः यावल तहसील कार्यालयात राबवला जाणार होता. मात्र, निराधार, अंध, अपंग व गरजू लाभार्थ्यांना तालुक्याला येण्याचा त्रास होऊ नये, यासाठी हा कार्यक्रम गावपातळीवरच शिबिर स्वरूपात घेण्याचे निर्देश आमदार अमोल दादा जावळे यांनी दिले. त्यांच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे गावातच ‘तहसीलची सेवा’ उपलब्ध झाली.

या उपक्रमाचे आयोजन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना तसेच अन्य सामाजिक योजनांसाठी DBT पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करण्यात आले.

कार्यक्रमात नायब तहसीलदार मनोज खारे, भालोद गावाचे सरपंच प्रदीप कोळी, तसेच कृषी भूषण नारायण बापू चौधरी यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना नारायण बापू चौधरी यांनी आमदार अमोल जावळे यांचे गावपातळीवरच तहसीलची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले व त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीनल जावळे व रमेश झांबरे यांनी लाभार्थ्यांना योजनांसंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल वानखेडे, भाऊसाहेब तहसील कार्यालय, सकावत तडवी संजय गांधी योजना अवल कारकून, मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे, तसेच भालोद मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी मोलाचे योगदान दिले
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने