Chunchale News चुंचाळे येथे आज अनोखा गुरू शिष्य पुण्यतिथी सोहळा भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम

यावल न्युज
 तालुक्यातील चुंचाळे येथे गुरू रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुद्ध बारसाला समाधिस्त झाले होते तेव्हा पासुन गुरू व शिष्य पुण्यतिथीचा आनोखा सोहळा दि. ९ मे रोजी श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारात होणार आहे 





श्री समर्थ सुकनाथ बाबा हे काशी येथुन भ्रमण करीत चुंचाळे येथे आले आणि बारा वर्ष अखंड तप केले म्हणून तेव्हा पासुन चुंचाळे या गावाला श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची तपभुमी म्हणून ओळखली जाते त्यानंतर त्यांचे शिष्य व चिरंजीव श्री समर्थ रघुनाथ बाबा यांचा जन्म चुंचाळे येथे झाला म्हणून त्यांची जन्मभुमी म्हणून हे ओळखले जाते या पिता पुत्राच्या समाधीचे स्थान ( वर्डी ता. चोपडा ) येथे आहे . सुकनाथ बाबा १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये ( वर्डी ता . चोपडा ) येथे समाधिस्त झाले त्यानंतर श्री समर्थ वासुदेव बाबा हे रघुनाथ बाबा सोबत राहत होते 

वासुदेव बाबा हे चुंचाळे गावात १९८० मध्ये आले त्यांनी ग्रामस्थ व शिष्यांना सहकार्याने गावात भव्य मदिर बांधण्यास प्रारंभ केला सुकनाथ बाबांच्या कथनाप्रमाणे मदिरा ला विट लावली तेव्हाच पासुन गावातील घराचे देखील बाधकाम सुरू झाले त्यानंतर १९८९ मध्ये श्री रघुनाथ बाबा यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या २१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली या मदिरा चा कळस ६१ फुट उंचीचा आहे श्री समर्थ वासुदेव बाबा हे नेहमीच वैशाख शुद्ध बारसाला त्यांचे गुरू श्री समर्थ रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात आपल्या गुरूची पुण्यतिथी सोहळा मी नसतानाही सुरू राहायला पाहिजे म्हणून गुरूच्या पुण्यतिथीच्या दिवशी वासुदेव बाबा चुंचाळे येथे समाधिस्त झाले 
असा हा गुरू शिष्य पुण्यतिथीचा सोहळा वासुदेव बाबा दरबारात मोठया उत्साहाने केला जातो 

असा तयार होतो महाप्रसाद
एक दिवस अगोदर मंदिर परिसरातील व गावातील महिला पिठ तयार करुन ठेवतात व रात्री आठ वाजेपासून सर्व महिला पुरणपोळी तयार करण्यासाठी मंदिराजवळ येतात आंब्याचा रस सकाळी मशिनरी द्वारे तयार करण्यात येतो सोबत मसाली रसी सुद्धा केली जाते

असा होईल कार्यक्रम 
सकाळी ६ ला मारोती अभिषेक ६.३० ला श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या मूर्तीला स्नान व मूर्ती अभिषेक ६.३० आरती ८.३० पासुन भजन भारूडांना सुरूवात होईल दुपारी १२ ला महाआरती होऊन १ वाजेपासुन महाप्रसादाला सुरूवात होईल असे आवाहान चुंचाळे ग्रामस्थानी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने