यावलः संपूर्ण महाराष्ट्रभर रासायनिक खतांच्या विक्रीसाठी बंधनकारक केलेल्या "लिंकिंग" पद्धतीमुळे विक्रेत्यांवर अनावश्यक बंधने व अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पद्धतीमुळे विक्रेत्यांच्या व्यापार स्वातंत्र्यावर गदा आली असून, त्यांच्यावर आर्थिक व कायदेशीर दडपण वाढले आहे.
यासंदर्भात मा फ दा राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी जळगाव येथे कार्यालयात सर्व तालुकाध्यक्ष व अधिकृत विक्रेते यांची बैठक बोलावून सदर लिंकिंगच्या विरोधात १ मे पासून खत खरेदी बंद करण्याच्या सुचना केल्या आहेत .
माफदा संघटनेच्या आदेशानुसार, राज्यभरातील सर्व खत विक्रेत्यांनी संघटनेच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे: कोणतीही नवीन रासायनिक खतांची खरेदी करू नये.कोणतीही खतांची डिलिव्हरी स्वीकारू नये.
विक्रेत्यांचे एकत्रित आंदोलन हेच त्यांच्या व्यापाराच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यावश्यक असून, या निर्णयाचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन माफदा संघटनेने केले आहे. लवकरच पुढील दिशा व निर्णय एकत्रितपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.