यावल : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांचा 'खान्देश आयकॉन पुरस्काराने' गौरव करण्यात आला आहे.
हा सन्मान जळगाव येथील हॉटेल कमल पॅराडाईजच्या सभागृहात सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मराठी मालिकांचे प्रसिद्ध सिने अभिनेते अभिजीत खांडकेकर, आमदार राजुमामा भोळे, डॉ. अर्चना सुर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राकेश फेगडे यांना हा पुरस्कार शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, उमेश फेगडे, सागर कोळी, उमेश बेंडाळे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू जर्नादन कोळी, तसेच सर्व संचालक मंडळ व कोरपावली गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.