भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनाचं सार्थक होते - असे ह.भ.प. स्नेहलताई महाराज सामनेर

यावलःजगाचे दुःख सोडून देवाचे चिंतन करावे. देवाच्या चिंतनातच खरा आनंद आहे. भगवंताच्या भक्ती मूळची जीवनाचं सार्थक होत असते म्हणूनच भक्तीचे आणि जीवनातील विचारांचे उत्तम प्रतीक आहेत. भगवंताचे नामस्मरण आणि भक्तीच्या सेवेमध्ये खुप ताकद आहे असे निरुपण ह.भ.प. स्नेहलताई महाराज सामनेर यांनी केले.
    सातोद येथे अखंड हरिनाम नामसंकीर्तन आठवडा सुरू आहे. या प्रसंगी महाराजांनी संत तुकारामांच्या अभंगातून भक्तांना भक्तीचा महिमा समजावून सांगितला. त्या म्हणाल्या, अभंग आजही लोकांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता आणतात. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे भक्ती, प्रेम आणि विठ्ठलावरच्या निष्ठेचे उत्तम उदाहरण आहेत.
    भगवंताचे नामस्मरण आणि भक्तीच्या सेवेमध्ये खुप ताकद आहे. जगात सर्व श्रेष्ठ नाम आहे यम सुद्धा तुकाराम महाराजांच्या नावाला घाबरतो ही ताकद नामा मध्ये आहे म्हणूनच भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनाचं सार्थक होते. असे ह.भ.प. स्नेहलताई महाराज यांनी सांगितले. 
    गावात श्रीमद्भागवत कथा व रोज होणाऱ्या कीर्तनासाठी अनमोल सहकार्य व आयोजन समस्त सत्संग समाज सातोद मिळत आहे. परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात संगीतमय श्रीमद्भागवत कथा व अखंड नामसंकीर्तन सप्ताह श्रवणाचा लाभ घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने