रेशन धान्य दुकानाची चौकशी करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

यावल : तालुक्यातील कोरपावली आणि आंबा पाणी या गावांतील रेशन धान्य दुकानदारांकडून मनमानी पद्धतीने कारभार होत असल्याचा गंभीर आरोप नागरीकांनी केला आहे. लाभार्थ्यांना धान्य कमी प्रमाणात देणे, तसेच दुकानावर आवक, विक्री व शिल्लक साठ्याचा फलक न लावणे अशा अनेक अनियमितता सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराबाबत किरण तायडे यांनी पुरवठा निरीक्षक, यावल यांना लेखी तक्रार निवेदन सादर केले आहे. त्यांनी या दोन्ही गावातील रेशन दुकानांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात तातडीने लक्ष न दिल्यास किरण तायडे यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने