उन्हाच्या झळा तीव्र; केळीचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा कव्हर क्रॉपचा पर्याय

यावल  सध्या एप्रिल महिना सुरू असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे शेतशिवारात उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. याचा थेट फटका केळीच्या उत्पादनावर बसण्याची भीती असल्याने शेतकरी आता नवे उपाय योजू लागले आहेत. विशेषतः केळीचे पीक उन्हापासून वाचवण्यासाठी अनेक शेतकरी कव्हर क्रॉप (छायादार पीक) लावण्याचा पर्याय अवलंबत आहेत.

केळी हे तापमानसंवेदनशील पीक असून जास्त उन्हामुळे पाने करपतात, पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. ही कव्हर क्रॉप्स मातीचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क कमी करत असल्याने मातीतील ओलावा टिकतो, गवताळ पिकांमुळे गवताळ ढाल मिळते आणि पर्यावरणात काही प्रमाणात गारवा राहतो.

यावल तालुक्यातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या प्रयोगांना चांगला प्रतिसाद दिला आहे. स्थानिक शेतकरी मनोज वायकोळे म्हणतात, कृषी विभागाच्याही माहितीनुसार, कव्हर क्रॉप वापरणे हा आधुनिक पद्धतीतील एक शाश्वत पर्याय असून, हवामान बदलांशी सामना करण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो.
शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे केळीच्या उत्पादनात काही प्रमाणात स्थिरता येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, हवामानातील वाढता तापमान आणि पाण्याचा अभाव यावर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने