यावल : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज यावल तर्फे दिनांक 25 एप्रिल रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मूक मोर्चा सकाळी 9 वाजता बोरावल गेट येथून सुरू होऊन तहसील कार्यालय यावल येथे पोहोचेल. या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात येत आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व नागरिकांना या शांततामय व शिस्तबद्ध मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.