यावल आगारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध उपचार

यावलः जळगाव येथिल वनिता मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल , यांच्या , माध्यमातुन यावल बस आगार येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आले होते शिबिरात 70 रुग्ण नी लाभ घेतला.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन साहेब होते . तसेच सहा .कार्यशाळा अधिक्षक तेजस शुक्ल , आगारलेखाकार जतीन बारसे , हेड मेकॅनिक प्रकाश रावते, संदिप पाटील लिपीक , अतुल चौधरी , के डी चौधरी , दिलीप ठाकरे , सुकलाल सूर्यवंशी बबलू तडवी यांनी सहकार्य केले .
शिबिरात वनिता मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल , जळगाव चे 
 तज्ञ डॉ.उज्वल मुंडे व डॉ वैभवी वाणी व हॉस्पिटल टीम उपस्थित होते या शिबिरात नि:शुल्क ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरची, इ.सी जी तपासणी केली. तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आल्या.

तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या सर्जरी सुद्धा मोफत केल्या जातील. शिबिराच आयोजन यावल आगारात करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तुषार महाजन यांनी मेहनत घेतली
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने