डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांची महसुल वसुलीत कौतुकास्पद कामगिरी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !!

डोंगर कठोरा ता यावल: चंदन सोनवणे

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कर्तव्यदक्ष तलाठी गजानन पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामात कायम नियमितता ठेऊन ई-चावडी वसुली अंतर्गत डोंगर कठोरा तलाठी सजा कार्यालयाची (१०० टक्के वसुली) पूर्ण करणे आणि तीन लाखापेक्षा जास्त वसुली करण्यात यशस्वी अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला

जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झालेल्या या सन्मान सोहळा कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते तलाठी गजानन पाटील यांनी ई-चावडी वसुली अंतर्गत डोंगर कठोरा तलाठी सजा कार्यालयाची (१०० टक्के वसुली) संपूर्ण वसुली पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला 

त्यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर नायब तहसीलदार संतोष विनंते,मंडळ अधिकारी अतुल बडगुजर,तलाठी मनीषा बारेला, कुर्शाद तडवी,अव्वल कारकून निशा चव्हाण यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने