सातपुड्याचा ऱ्हास: वन्यप्राणी वळले गावाकडे

यावलः चोपडा/यावल/रावेर: येथून साधारण ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या विशाल सातपुडा पर्वताचा सातत्याने होत असलेला ऱ्हास आता धोक्याची घंटा ठरत आहे. पाणी व पुरेसे अन्न या मुळे वन्य प्राणी आता गावांच्या दिशेने मोर्चा वळवू लागले आहेत, यावल तालुक्यात ठीक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सातपुडा पर्वतातील काही अति दुर्गम भागांत परप्रांतीयांनी बस्तान मांडले असून, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून अतिक्रमण केलं जात आहे. विशेषतः सागवान खैर अशे अनेक कायदेशीर लाकडांचा देखील मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. याशिवाय, अनेक वेळा या भागात जाणीवपूर्वक आगी लावल्या जातात, त्यामुळे दुर्मीळ वनस्पती देखील नष्ट होत आहेत. परिणामी, सातपुड्याचं जैवविविधतेचं संपन्नतेवर गदा येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून जंगलतोड करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देणं अत्यावश्यक आहे, अन्यथा सातपुड्यातील अमूल्य निसर्गसंपत्ती कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने