यावल तहसील कार्यालयात शिस्तबद्ध निंदनीकरण; जुने रेकॉर्ड झाले सुव्यवस्थित

यावल : येथील तहसील कार्यालयात आज कार्यालयीन रेकॉर्ड निंदनीकरणाचे काम मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. जुने रेकॉर्ड, नोंदी तसेच सर्व महत्वाची कागदपत्रे व्यवस्थित लावून त्यांची योग्य नोंद घेण्यात आली.

या कामात तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, ग्राम महसूल सेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वांनी एकजुटीने काम करत जुने रेकॉर्ड आणि कागदपत्रांचे वर्गीकरण, जतन आणि व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम केले. यामुळे भविष्यातील शासकीय कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने हे काम यशस्वी झाले. तहसीलदार नाझीरकर यांनी तहसील कार्यालयात कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात रेकॉर्ड व्यवस्थापन, कार्यालयीन शिस्त आणि नागरिकांना सहज सेवा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

नवीन पद्धतीने सुरु झालेल्या या उपक्रमाबद्दल कर्मचारीवर्गात समाधान व्यक्त होत असून, कार्यालयीन कामकाजात गती येईल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने