यावलः यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आज तहसिलदार नाझीरकर मॅडम यांना निवेदन दिले आहे.
काल झालेल्या काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा गोळीबार करून भीषण हत्याकांड करून बळी घेतले. त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.मृत भारतीय व परदेशी व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
अनेक वर्षापासून जम्मू काश्मीरमधील खोऱ्यात आतंकवादी आपल्या जवानांवर ,नागरिकांवर हल्ले करत असून ते शहीद होत आहे.केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे.तसेच केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून अतिरेक्यांचा बिमोड करावा आणि पाकिस्तान ला धडा शिकविला पाहिजे.त्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी.
काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करावी,केंद्रीय सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात यावी व अपयशी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मृतुमुखी पडलेल्या शहीद नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शहिदांच्या परिवारा प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.निवेदन देताना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शरद कोळी,संतोष धोबी,पप्पू जोशी,सुनील बारी,योगेश चौधरी,योगेश राजपूत पाटील,प्रवीण लोणारी,सारंग बेहेडे,विनोद कोळी,हुसेन तडवी,विजू कुंभार,पिंटू कुंभार,सागर बोरसे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.