यावल: येथील नगरपरिषद प्रशासनामार्फत पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवण्यात येत असून आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार व सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी के पी पाटील त्यांच्या सहकार्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी श्री निशिकांत गवई यांच्च्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमार्फत पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम दि. 23/04/2025 सुरू करण्यात आली.
यावल तालुका हा केंद्रीय भूजल मंडळाकडून भूजल पातळीसाठी शास्त्रीय दृष्ट्या अति शोषित घोषित करण्यात आलेला आहे यावल रावेर तालुका परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस घटत असून पुढील काळात पाण्याचे दुर्मिळ निर्माण होऊ शकते यावर उपयोजना म्हणून यावल नगरपालिका क्षेत्रातील नदीवर भूचर खोदणे काम नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतले आहे.तरी हडकाई-खडकाई नदीत विविध ठिकाणी भूचर खोदकाम नगरपरिषद मार्फत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून व यावल नगरपरिषद कडून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 असा पंधरा दिवसाचा कृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या पंधरवड्याचा एक भाग म्हणून पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम नगर परिषद प्रशासनामार्फत राबवण्यात येत आहे यासाठी अभियंता सत्यम पाटील,कार्यालयीन अधीक्षक आर के गावंडे , स्थापत्य अभियंता संग्राम शेळके , लिपिक कामीलुद्दीन शेख, स्वच्छता निरीक्षक दिनेश घारू, गाळणी चालक शुभम भांडे, शहर समन्वयक स्नेहा रजाने व स्वच्छ भारत मिशन चे अजय मेढे सदर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत नगरपरिषद प्रशासना मार्फत पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम