फैजपूर प्रतिनिधी :
फैजपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले एपीआय रामेश्वर मोताळे यांची पोलीस निरीक्षक (PI) पदावर निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावत असताना मोताळे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, विविध गुन्ह्यांची उकल करणे तसेच सामान्य नागरिकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कर्तव्यदक्षतेची व प्रामाणिक सेवेची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्यांना पीआय पदावर पदोन्नती दिली आहे.
या निवडीबद्दल भालोद येथील पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे, पीएसआय मिरज गोकील तसेच फैजपूर येथील पत्रकार सलीम पिंजारी यांनी मोताळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.