जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल राजपूत यांची बिनविरोध निवड

यावल प्रतिनिधी दिनांक: ७ एप्रिल २०२६

जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी शिरसाळा (ता. बोदवड) येथे भव्य मेळावा व बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राज्याध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन मागविण्यात आले असता, जळगाव जिल्ह्यातून एकमेव अर्ज विशाल उज्जैनसिंग राजपूत यांचा प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत यांनी तत्काळ जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये —
जिल्हा उपाध्यक्ष: अरुण पाटील
जिल्हा सचिव: देवेंद्र जाधव
फैजपूर विभागीय अध्यक्ष: महेंद्र चौधरी
भुसावळ विभागीय अध्यक्ष: रवींद्र धांडे
जळगाव विभागीय अध्यक्ष: विजय पाटील
एरंडोल विभागीय अध्यक्ष: जितेंद्र बडगुजर
पाचोरा विभागीय अध्यक्ष: ईश्वर पाटील
अमळनेर विभागीय अध्यक्ष: चंद्रकांत सरदार
जिल्हा कार्याध्यक्ष: नवल सानप
जिल्हा सरचिटणीस: ज्ञानेश्वर सुरडकर
जिल्हा खजिनदार: प्रशांत सरोदे
जिल्हा संघटक: कुलदीप पाटील
प्रसिद्धीप्रमुख: किरण पाटील
महिला जिल्हाध्यक्ष: वर्षाली पाटील

या कार्यक्रमास राज्य कोअर कमिटी अध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, राज्य उपाध्यक्ष प्रवीण चीखलकर, तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष पंडित इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जळगाव जिल्ह्यातील सुमारे २०० महसूल सेवक उपस्थित होते.
या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने