फैजपूर :
नुकत्याच झालेल्या फैजपुर नगरपालिका निवडणुकी मध्ये बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे सामान्य कार्यकर्ते सिद्धेश्वर वाघुळदे यांचे फैजपूर नगरपालिका भाजपा गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
फैजपूर नगरपालिकेमध्ये भाजपाचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर तीन अपक्षांना सोबत घेऊन नगराध्यक्षां सह एकूण 13 सदस्यांच्या गटाची नोंदणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
याप्रसंगी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी श्री. सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली. फैजपूर शहरातील सामाजिक कार्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षापासून सक्रिय असलेल्या या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळे शहरातील सर्वच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
नगराध्यक्षा सौ दामिनी पवन सराफ यांच्या सहकार्याने पैसे शहराचा सर्वांगीण विकास करण्याची आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी श्री सिद्धेश्वर वाघुळदे सर यांच्यावर सोपवण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उप गटनेतेपदी नगरसेवक सुरज गाजरे यांची निवड करण्यात आली.
गटनिवडीच्या प्रसंगी आ. अमोल जावळे यांच्यासोबतच फैजपूर नगराध्यक्षा सौ दामिनीताई सराफ, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. हिरालाल चौधरी, फैजपूर मंडलाध्यक्ष उमेश बेंडाळे, तालुका सरचिटणीस पिंटू तेली, सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष हेमराज खुशाल चौधरी, संदीप भारंबे पवन सराफ, अनंत नेहेते, नरेंद्र चौधरी राजू महाजन सर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.