यावल : किरण तायडे
येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी यावल नगर परिषदच्या २३ प्रभागासाठीच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत नगर परिषदच्या सभागृहात प्रांत अधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षेतेखाली तसेच मुख्याधिकारी निशिकांत गवई व नगररचना विभागाच्या नुपूर फालक,पाणी पुरवठा विभागाच्या अनुराधा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली.यात १२ महिलांचे व ११ पुरुषांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
यावल नगर परिषदच्या सभागृहात आज दि.९ ऑक्टोबर २५ रोजी दुपारी २ वाजता फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली यावल नगर परिषदच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावल नगर परिषदच्या होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले असुन यावल नगर परिषदच्या २३ प्रभागांचे आरक्षण काढून जाहीर करण्यात आले.
प्रभागनिहाय काढण्यात आलेले उमेदवारांचे आरक्षण हे पुढील प्रमाणे राहणार आहेत.यात प्रभाग क्रमांक १ अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक २ अनुसुचित जाती व सर्वसाधारण महीला,प्रभाग क्रमांक ३ मध्ये ना.म.प्र.महीला व सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसुचित जाती महिला व सर्व साधारण,प्रभाग क्रमांक ५ मध्ये ना.म.प्र.व सर्व साधारण महिला,प्रभाग क्रमांक ६ मध्ये ना.म.प्र.महिला व सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक ७ करीता ना.म.प्र.महिला व साधारण,प्रभाग क्रमांक ८ साठी सर्व साधारण महिला व सर्वसाधारणसाठी राखीव असणार आहेत.त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वसाधारण महीला व सर्वसाधारण,प्रभाग १० मध्ये ना.म.प्र. व सर्वसाधारण महीला तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसुचित जमाती महिला व ना.म.प्र.आणी सर्वसाधारण महीला करीता आरक्षीत करण्यात आले आहे.