यावल न्युज :
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मनसेचा ठाम आवाज!
यावल,विरवली, दहिगाव,सावखेडा सिम,नायगाव किनगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या सकाळच्या बसची वेळ विद्यार्थ्यांसाठी योग्य नसल्यामुळे, शाळा- कॉलेजला वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे विद्यार्थी सेनेने सकाळच्या बसची वेळ लवकर करावी,
प्रवासी संख्या लक्षात घेता, दुसरी अतिरिक्त बस सुरू करावी.
यावल चोपडा सेटल सुरु करण्यात यावी..ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज जळगाव व चोपडा ये-जा करतात. उशीरा बस मिळाल्याने शाळा, कॉलेजला उशीर होतो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यासोबतच पालकांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले
निवेदन देताना मनसे जनहित कक्ष राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर,मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार,तालुका अध्यक्ष जनहित कक्ष किशोर नन्नवरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, पंकज कोळी, कुणाल पाटील, दुर्गेश कोळी उपस्थित होते..
विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शिक्षणाच्या न्यायासाठी मनसेचा लढा सुरूच राहील!