यावल तालुक्यात इंद्रधनुष्याचे देखणे दर्शन!

यावल न्युज : हर्षल आंबेकर 
यावल तालुक्यातील गाव परिसरात रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसानंतर आकाशात देखणं इंद्रधनुष्याचे सुंदर दर्शन घडले. अचानक दिसलेल्या या इंद्रधनुष्याने गावकऱ्यांना आणि प्रवाशांना मंत्रमुग्ध केले. आकाशात उमटलेले सात रंग जणू निसर्गाचा देखणा सोहळाच ठरला.



गावकरी मोठ्या उत्साहाने या इंद्रधनुष्याचे दर्शन घेत होते. अनेकांनी मोबाईलमध्ये त्याचे क्षण टिपले. विशेष म्हणजे या इंद्रधनुष्याचे मनमोहक छायाचित्र यावल न्यूजचे संपादक हर्षल आंबेकर यांनी कॅमेऱ्यात कौशल्याने बंदिस्त केले आहे.

पावसाळ्यात नेहमीच इंद्रधनुष्याचे दर्शन क्वचितच घडते. त्यामुळे अचानक उगवलेल्या या निसर्गरंगांच्या कमानीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, निसर्गप्रेमींच्या दृष्टीने ते एक आकर्षण ठरत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने