बामनोद: एक सप्टेंबर 2025 रोजी यावल तालुक्यातील भारत विद्यालय न्हावी येथे यावल तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. विज्ञान नाट्य महोत्सव हा कार्यक्रम विज्ञानासंदर्भात माहिती देणारा असून नाटिकेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून विज्ञानाच्या माध्यमातून प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून व समाजामध्ये विज्ञानाचे महत्त्व अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून विज्ञानाट्यमहोत्सवासारखे कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत असतो
पी एस एम एस स्कूल बामणोद या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्व या विषयावर विज्ञान नाट्य महोत्सवात सहभाग नोंदवला होता. स्वच्छता ही आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचीआहे घाणकचऱ्यामुळे व परिसर स्वच्छ नसल्यामुळे आपल्या घराच्या अवतीभवती किंवा आपल्या गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे नियोजन नसल्यास परिसरामध्ये आपल्या शहरांमध्ये आजार मोठ्या संख्येने पसरत असतात ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनात स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे हे पटवून देण्यासाठी ह्या मुलींनी सर्वांसाठी स्वच्छता या विषयावर नाटिका सादर केली
वैज्ञानिक दृष्टिकोन नाटिकेच्या स्वरूपात सादर केला हे नाटक बसविण्यात व यशस्वी करण्यासाठी गणेश जावळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यांच्या सोबत बी एम लहासे श्रीमती आर आय तडवी ए एच वंजारी श्रीमती सी जी चौधरी सहकार्य केले. विज्ञान नाट्यमहोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केलेल्या कामगिरीचे प्राचार्य श्रीयुत आर एस अडकमोल यांनी कौतुक करीत.संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन व्ही कोल्हे व संस्थेचे चेअरमन डॉक्टर जे डी भंगाळे तसेच सचिव श्रीयुत पी एस नेमाडे भाऊसाहेब व सर्व संचालक आणि माननीय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल श्रीयुत विश्वनाथ धनके साहेब आदीसर्वांनी मुलांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात सर्व टीमचा सत्कार केला त्याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते