यावल न्युज : किरण तायडे
सांगवी बु (ता. यावल) येथील रहिवासी भूषण धांडे यांनी आपल्या कन्या तनिष्का हिच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त समाजात पर्यावरण संवर्धनाचा सुंदर आणि प्रभावी संदेश देत गावात दहा अशोक वृक्षांची लागवड केली. वाढदिवसाच्या दिवशी आयोजित या उपक्रमात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे, फक्त वृक्षारोपण करून थांबता न राहता या वृक्षांचे संगोपन, पाणीपुरवठा आणि देखभाल करण्याची जबाबदारीही भूषण धांडे यांनी स्वतःवर घेतली आहे. “वाढदिवस हा फक्त आनंदाचा क्षण नसून, समाजाला काहीतरी चांगले देण्याची संधी आहे” असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.
ग्रामस्थांनी या आगळ्या-वेगळ्या पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीचे मनापासून कौतुक केले. धांडे यांचा हा उपक्रम भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. हिरवाई वाढविण्याच्या या स्तुत्य व अनुकरणीय कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.