यावल तालुक्यात ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

यावल : हर्षल आंबेकर
यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज दुपारी २ वाजता यावल तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या समवेत महसूल कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते विविध प्रवर्गानुसार आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

अनुसूचित जमाती (एसटी):
भालशीव, बोरावल बु., मोहराळे, वढोदे प्र. यावल, बोरखेडा बु., सावखेडे सिम., वड्री खु., मनवेल, किनगाव बु., पिळोदे खु., कोसगाव, मारुळ, पाडळसे, सांगवी खु., बोरावल खु., थोरगव्हाण, बोराळे, बामणोद, विरोदे, चिखली बु., राजोरा.

अनुसूचित जाती (एससी):
पिंप्री, सांगवी बु., अट्रावल, कोळवद, हंबर्डी, म्हेसवाडी, पिंपरुळ, नावरे.

इतर मागास प्रवर्ग (नामाप्र):
चिखली खु., वडोदे प्र. सावदा.

सर्वसाधारण:
न्हावी प्र. अडावद, चुंचाळे, शिरागड, कासवे, कासारखेडा, नायगाव, आडगाव, गिरडगाव, डांभुर्णी, शिरसाड, दुसखेडा, चिंचोली, कोरपावली, अंजाळे, विरावली बुद्रुक, डोंगर कठोरा, किनगाव खुर्द, आमोदे, निमगाव, हिंगोणे, सातोद, महेलखेडी, उंटावद, साकळी, न्हावी प्र. यावल, भालोद, पिळोदे बुद्रुक, चितोडा, दहिगाव, टाकरखेडा, वनोली, डोणगाव.

या आरक्षणानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस नवसंजीवनी मिळणार असून स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने