साकळीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक – भिषण अपघातात एक ठार, एक गंभीर

यावल न्युज :
यावल तालुक्यातील साकळी गावाजवळ रविवारी (दि. २७ जुलै) सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृत्यू झालेल्याचे नाव राजेंद्र रमेश सपकाळे (वय ४५, रा. वढोदा, ता. यावल) असे असून, ते साकळी येथून वढोद्याकडे आपल्या एमएच १९ ईबी ५४४२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास वसंत महाजन यांच्या जिनिंगजवळील पुलाच्या वळणावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

मयत राजु सपकाळे हे भाजपाचे कार्यकर्ते होते, तसेच ते जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे यांचे भाचे होते. या दुर्घटनेमुळे वढोदा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने