यावल न्युज : जिवन चौधरी
तालुक्यातील दहिगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 रोजी पहाटे घडली याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दहिगाव येथील प्रदीप घनश्याम महाजन वय 35 हा मोहराळे शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांचे शेतात पिकांना पाणी घालण्यासाठी गेला असता विहिरीजवळ पाय घसरून त्याचा तोल जाऊन विहिरीतील पाण्यात बुडून मयत झाला हा प्रकार आज दिनांक 15 रोजी पहाटे घडला
याबाबत यावल पोलिसात पुरुषोत्तम छगन महाजन यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांचे मार्गदर्शनाखाली दहिगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत मयताचे पश्चात आई-वडील एक बहीण असा परिवार आहे