यावल न्युज : हर्षल आंबेकर
तालुक्यातील ६७ ग्रामपंचायती पैकी ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदा साठीची आरक्षण सोडत दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेला उपविभागीय अधिकारी फैजपुर बबन काकडे तसेच तहसीलदार यावल मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात सदर आरक्षण सोडत जाहिर केली जाईल. तरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या त्या ग्रामपंचायतीतील नागरीकांना उपस्थितीचे आवाहन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे कडून करण्यात आले आहे.
यापूर्वीही 21 एप्रिल 2025 रोजी सदर ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती आरक्षण सोडत निघाल्यानंतर भावी सरपंचांनी गुडग्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरु केली होती परंतु सदर आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा नव्याने आरक्षण सोडत करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असुन भावी सरपंचांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
या ग्रामपंचायतीचे निघेल आरक्षण :
भालशिव, सातोद, बोरावल बुद्रुक, चिखली खुर्द, कोळन्हावी, महेलखेडी, मोहराळे, उंटावद, पिंप्री, कोळवद, वढोदे, किनगाव बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, पिळोदे खुर्द, सावखेडेसिम, कोसगाव, चुंचाळे, मारुळ, शिरागड, बामणोद, कासवे, पाडळसे, वड्री खुर्द, साकळी, कासारखेडा, सांगवी खुर्द, नायगाव, विरोदा, आडगाव, न्हावी, गिरडगाव, हंबर्डी, डांभुर्णी, भालोद, शिरसाड, बोरावल खुर्द, दूसखेडा, म्हैसवाडी, चिंचोली, पिळोदे बुद्रुक, कोरपावली, चिखली बुद्रुक, मनवेल, चितोडा, वढोदा प्र.सावदा, राजोरा, अंजाळे, दहिगाव, विरावली बुद्रुक, टाकरखेडा, डोंगरकोठरा, पिंपरूड, किनगाव खुर्द, थोरगव्हाण, आमोदे, वनोली, निमगाव, डोणगाव, सांगवी बुद्रुक, नावरे, हिंगोणे, बोराडे व अट्रावल या गावांचे आरक्षण जाहिर होणार आहे.