यावल न्युज : किरण तायडे
ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी बुद्रुक येथे दि. २४ जुलै २०२५ रोजी गुरुवारी बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत व्यवहारे (शाखाधिकारी, युनियन बँक सांगवी बु.) होते, तर बक्षीस वितरण सुधीर भंगाळे (शाखाधिकारी, जेडीसीसी बँक सांगवी बु.) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल कवठे (सहाय्यक अभियंता, महावितरण - MSEB) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन वाय. डी. नेमाडे यांनी तर आभार प्रदर्शन पी. एम. भंगाळे यांनी केले. यावेळी प्रकाश मंडळ सांगवी बुद्रुक संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चिंतामण धांडे, चेअरमन चंद्रकुमार चौधरी, व्हा. चेअरमन भालचंद्र भंगाळे, चिटणीस उल्हास चौधरी, तसेच बक्षीस दाते वासुदेव रामदास भंगाळे, एस. आर. पाटील, गोवर्धन ढाके आणि कमलताई पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात शशिकांत व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे राहुल कवठे यांनीही यशासाठी मेहनतीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना उद्देशून मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत व्ही. व्ही. धनके यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक, बक्षीस प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक, तसेच गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा समारंभ विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा व प्रेरणा निर्माण करणारा ठरला.