हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे महिलेला प्रसूतीदरम्यान त्रास; संतप्त नागरिकांकडून तीव्र नाराजी

यावल न्युज : हर्षल आंबेकर

हिंगोणा (ता. यावल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेळेवर अनुपस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः गुरुवारी, दिनांक १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता एका महिलेला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र त्या वेळी केंद्रात एकही कर्मचारी वा वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी, सदर महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.




या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल करत म्हटले की, "जर प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हाला वेळेवर सेवा देऊ शकत नसेल, तर अशा केंद्राचे अस्तित्वच व्यर्थ आहे; ते कायमचे बंद करावे."

या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत "राष्ट्रीय महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य" या संघटनेने काही उपाययोजना सुचविल्या आहेत



या प्रकारामुळे एकंदरीत महिलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक संघटनांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने