हाजी शेख फारुख यांची यावल शहर काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

यावल न्यूज : भरत कोळी

यावल : येथील डांगपुरा भागातील रहिवासी आणि समाजसेवक म्हणून ओळख असलेले हाजी शेख फारुख शेख युसुफ यांची यावल शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या आदेशाने व काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
हाजी शेख फारुख यांचा यावल शहरात व विशेषतः मुस्लिम समाजात चांगला प्रभाव असून, हिंदू-मुस्लिम समाजाच्या सर्व सण-उत्सवांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. त्यांच्या समाजसेवेचे विविध स्तरांवर कौतुक झाले असून, यावल पोलीस स्टेशनमार्फतही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

त्यांच्या निवडीमुळे यावल शहर काँग्रेसला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे कार्य अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हाजी शेख फारुख यांच्या निवडीबद्दल शहरातून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने