यावल तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव

यावल न्युज : हर्षल आंबेकर
यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत मंगळवार, दिनांक 8 जुलै रोजी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. तालुक्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती पेसा क्षेत्रात मोडत असल्याने त्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. उर्वरित 63 ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी 50 टक्के जागांवर महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली अनु. जातीसाठी 8, अनु. जमातीसाठी 21, इतर मागास प्रवर्गासाठी 17 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2 वाजता प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या 33 आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या.

आरक्षण सोडतीच्या या कार्यक्रमात नायब तहसीलदार शैलेश तरसोदे, अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांनी कामकाज पाहिले. ईश्वर चिठ्ठ्या बालिकेच्या हस्ते – मोहम्मद अली अन्सार खाटीक – यांच्या हातून काढण्यात आल्या. सकाळपासूनच नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.

अनुसूचित जमाती आरक्षण:
बोराळे, वड्री खु ,कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, पाडळसे , साकळी, हंबर्डी, पिळोदे बुद्रुक, राजोरे

अनुसूचित जमाती महिला आरक्षण:
कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द, चिखली बुद्रुक, चितोडा

अनुसूचित जाती आरक्षण:
निमगाव, किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी

अनुसूचित जाती महिला आरक्षण:
वनोली, दुसखेडे, न्हावी, अंजाळे

नामाप्रः 
भालशिव. हिंगोणे. आमोदे. नायगाव. सातोद. कासारखेडा. किनगाव खुर्द. विरावली .

नामाप्र प्रवर्ग महिला आरक्षण:
दहिगाव, भालोद, चुंचाळे, गिरडगाव, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कोळवद, महलखेडी

सर्वसाधारण आरक्षण:
चिखली खुर्द, चिंचोली, शिरागड, बोरखेडा बुद्रुक, सावखेडा सिम, थोरगव्हाण, पिंपरुड, टाकरखेडे 

सर्वसाधारण महिला आरक्षण:
अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, कोळन्हावी, वढोदे प्र. यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने