सांगवी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादएकूण 443 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

यावल न्युज : 
यावल-रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जुलै 2025 रोजी सांगवी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे सहभाग घेत लाभार्थ्यांना विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ दिले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, तसेच विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महसूल विभागामार्फत देण्यात आलेले लाभ खालीलप्रमाणे :

जिवंत सातबारा: 42

ई-हक्क नोंदणी: 42

मजमअ दुरुस्ती: 155

मतदार यादी अद्ययावत कार्य :

नवीन नोंदणी: 42

मयत नाव वगळणे: 38

नाव दुरुस्ती: 4


संजय गांधी निराधार योजना लाभार्थी: 132

आरोग्य तपासणी शिबिर लाभार्थी: 24


इतर विभागांमार्फत देण्यात आलेले लाभ :

तालुका कृषी अधिकारी कार्यालय: 17 सेवा

पुरवठा विभाग शिधापत्रिका वाटप: 18

सेतू केंद्रमार्फत :

उत्पन्न दाखले: 26

जातीचे दाखले: 24

वय, अधिवास व रहिवास दाखले: 12


जननी सुरक्षा योजना: 19 लाभार्थी

लेक लाडकी योजना: 4

आयसीडीएस योजना (बालविकास): 16


एकूण लाभार्थी संख्या: 443

या कार्यक्रमात कृषी भूषण नारायण बापू चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे, भाजप तालुका अध्यक्ष सागर कोळी, तसेच सांगवी बुद्रुक परिसरातील विविध गावांचे सरपंच, सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम गावकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देणारे हे शिबिर यशस्वी ठरले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने