यावल न्युज :
यावल तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच झाडे, शेतीपंप, शेड्स आणि इतर शेतमालाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर- यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
शासन स्तरावरून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पंचनामे अत्यंत आवश्यक असल्याने, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके तातडीने कामाला लागली आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणा सज्ज असून लवकरच नुकसान भरपाईसंदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे आमदार जावळे यांच्या कडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी धीर न सोडता तहसील कार्यालयाशी संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही तातडीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले