यावल संजय गांधी योजनेतील आधार व्हेरिफिकेशनचे ९५% काम पूर्ण – नायब तहसीलदार मनोज खारे यांची माहिती

यावल न्युज : हर्षल आंबेकर
यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन (DBT) चे काम सध्या जलद गतीने सुरु असून यापैकी ९५% काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मनोज खारे यांनी दिली.
या कामासाठी संजय गांधी शाखेतील संपूर्ण टीम एकजुटीने प्रयत्नशील आहे. यामध्ये अव्वल कारकून सकावद तडवी, वैशाली पाटील, व्हीडी पाटील तसेच ऑपरेटर भूषण सोनार हे सर्वजण कार्यरत आहेत. हे सर्व काम यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जात आहे.

नायब तहसीलदार मनोज खारे हे स्वतः या विभागाचे कामकाज पाहत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ मिळण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन आवश्यक आहे आणि यासाठी प्रशासनाचे प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने