यावल न्युज
यावल तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीला "लव्ह जिहाद" प्रकरणात बुरखा घालण्यास जबरदस्ती केली गेल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी ही चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी फरहान हकीम खाटीक (रा. किनगाव, ता. यावल) याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दोघांची ओळख २०२२ मध्ये बसमधून प्रवास करताना झाली आणि त्यानंतर स्नॅपचॅटद्वारे संवाद सुरू झाला.
फरहानने तरुणीवर मानसिक दबाव आणून "प्रेम स्वीकार न केल्यास आत्महत्या करेल" अशी धमकी दिली. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता पीडित तरुणी जळगावातील मॉल मध्ये खासगी कामानिमित्त गेली असताना फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघेही रा. किनगाव) यांनी तिचा पाठलाग केला. त्यावेळी फरहानने तिला बुरखा घालण्यास भाग पाडले आणि बुरखा न घातल्यास किंवा काढल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जळगाव मधील मॉलमध्ये बुरखा काढण्यावरून वाद झाल्याने 112 नंबर डायल करून पोलिसांना बोलवण्यात आले सायंकाळी या प्रकरणाची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्यातील सपोनि संदीप पाटील, संदीप वाघ, सुधाकर अंबोरे, अतुल चौधरी, शरद वंजारी, सिद्धेश्वर डाफकर याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फरहान हकीम खाटीक (वय २३) व जमील कुरेशी (दोघे रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरडे हे करीत आहे