चितोडे ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टरची खरेदी : स्वच्छतेच्या दिशेने मोठे पाऊल

यावल न्युज : चितोडे ता यावल

१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून चितोडे ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा संकलनासाठी नवीन ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांतून स्वागत होत असून, स्वच्छतेच्या दिशेने ग्रामपंचायतीचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ट्रॅक्टर खरेदी प्रसंगी ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. तळले, लोकनियुक्त सरपंच अरुण पाटील, उपसरपंच प्रदीप धांडे, ग्रामपंचायत सदस्य बेबीताई कडू पाटील यांच्यासह इतर सर्व सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

सदर ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावातील घनकचरा संकलन व वाहतूक अधिक सुलभ होणार असून स्वच्छतेसाठीचा एक ठोस उपाय म्हणून याकडे पाहिले जात आहे. गावात स्वच्छता राखण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

चितोडे ग्रामपंचायतीने हा निर्णय घेत विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे, 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने