यावल न्युज
जळगांव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (खरीप)२०२५-२६ अंतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थी विरावली येथे दाखल झाले असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा.बी.एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.एम.भोळे व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावीत, विशाखा सोनवणे, धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे या विद्यार्थीनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात राहणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांद्वारे आणि प्रात्यक्षिकांच्या साह्याने माहिती देणार आहेत.
शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्राज्ञान, पिकांवर येणारे रोग व त्यासंबंधित माहिती व त्यांचे निवारण या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
कृषीकन्यां सोबत गावातील ग्रामसेविका छाया पाटील व गावातील शेतकरी उपस्थित होते आणि शेतकऱ्यांची भेट घेऊन कृषिकन्या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधित ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत