यावल न्युज
यावल तालुक्यातील वढोदा प्र. सावदा परिसरात अवैध माती व मुरूम (गौण खनिज) वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कठोर कारवाई करत सदर वाहन जप्त केले आहे. डंपर क्रमांक MH-19 CX-4648 याला ५ मे २०२५ रोजी यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, वढोदा प्र. सावदा येथून मुरूमाची अवैध वाहतूक करत असलेले डंपर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. चौकशी दरम्यान वाहनचालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डंपर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत मंडळ अधिकारी एम. एच. तडवी (फैजपूर), मंडळ अधिकारी बाबित चौधरी (बामणोद), तसेच ग्राम महसूल अधिकारी
श्वेता आर. ससाणे (पिंपरूड)
तेजस पाटील (फैजपूर-१ .)
श्रीकांत केंद्रे (फैजपूर-२)
अजय महाजन (न्हावी प्र. यावल-झोटे अमोदा)
राजू गोरटे (सांगवी बुद्रुक)
हेमा संगोळे (अट्रावल)
सुचिता देशभ्रतार (दुसखेडा)
मंजुषा पाटील (अकलूड) उपस्थित होते
महसूल विभागाच्या या संयुक्त कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाने अशा प्रकारच्या अनधिकृत वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.