यावल न्युज
यावलः केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातीनिहाय जनगणना निर्णयाचा आनंदोत्सव आज भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, अंत्योदयच्या तत्त्वावर चालणाऱ्या भारताच्या समावेशक वाटचालीला गती देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
भाजपाचे आमदार मा. अमोल जावळे यांच्या नेतृत्वात हा आनंदोत्सव वाजतगाजत, फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयानुसार आगामी जनगणनेमध्ये जातीची नोंद करण्यात येणार आहे. यामुळे देशातील ओबीसी, दलित, वंचित, पीडित, आदिवासी आदी सर्व सामाजिक घटकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे वास्तव समोर येईल. त्याआधारे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास योजनांचा लाभ पोहोचविणे सरकारसाठी सुलभ होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांना समतेची व विकासाची संधी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, उमेश फेगडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फ छोटू पाटील, यावल विभागाचे मंडळ अध्यक्ष सागर कोळी, उमेश बेंडाळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक नरेंद्र नारखेडे, भाजपाचे माजी यावल शहराध्यक्ष भरत पाटील, निलेश गडे, गोपालसिंग पाटील, हेमराज उर्फ बाळू फेगडे, शहराध्यक्ष राहुल बारी तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नितीन चौधरी उपस्थित होते.