यावल-रावेर मतदारसंघात नागरी विकासाला चालना — आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

यावल न्युज
 यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल, रावेर व फैजपूर नगरपरिषद क्षेत्रांतील प्रलंबित व सुरु असलेल्या विविध नागरी विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार मा. अमोल हरिभाऊ जावळे यांनी भूषवले.
या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) श्री. सौरभ जोशी, तसेच यावल, रावेर व फैजपूर नगरपरिषदांचे मुख्याधिकारी प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत नागरी भागातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा, मंजूर निधीची अंमलबजावणी, नागरी सुविधांमध्ये पारदर्शकता व गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या वेळी बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले, “शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय अत्यंत आवश्यक आहे. नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही.”

बैठकीत घेतलेले निर्णय व दिलेले निर्देश यामुळे नागरी जीवन अधिक सुसज्ज, स्वच्छ आणि प्रगतीशील करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले गेल्याचे मानले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने