यावल : तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये प्रथमच एकाच वेळी तीन मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किंनगाव साकळी मंडळाचे अध्यक्षपद अनिल रामराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले असून, यावल मंडळाच्या अध्यक्षपदी सागर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, फैजपूर मंडळाचे अध्यक्ष म्हणून उमेश बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे.
नमस्कार!
आमचा अधिकृत WhatsApp चॅनेल आता सुरू झाला आहे!
ताज्या अपडेट्स, विशेष माहिती, ऑफर्स, आणि बरेच काही थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा.
आमच्या चॅनेलला आजच जॉइन करा: https://chat.whatsapp.com/ECPKgC39qa19dEzJYiz7Ho
जॉइन करा आणि कोणतीही अपडेट्स मिस करू नका!
या नव्या युवा नेतृत्वाच्या निवडीमुळे तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्याने झालेल्या अध्यक्षांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.त्यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष शरद महाजन तसेच राकेश फेगडे उमेश फेंगडे भरत महाजन भरत पाटील उज्जेन सिंग राजपूत हर्षल पाटील नारायण बापु नागेश्वर साळवे मुकेश कोळी अतुल भालेराव योगेश चौधरी हेमराज फेगडे आदी उपस्थित होते
भाजपने घेतलेला हा निर्णय पक्षाच्या विस्तार आणि संघटनबळ वृद्धीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.