यावल – यावल ते फैजपूर दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याचा दररोज हजारो नागरिक व वाहनचालक वापर करतात, परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे.
वाहनांची गती मंदावल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो आहेच, शिवाय अपघातांचाही धोका वाढला आहे. नागरिकांमध्ये यामुळे संताप व्यक्त होत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तोंडी वा लेखी तक्रारी केल्या असल्या तरीही कुठलीच दखल घेतली गेलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे
.