यावल तालुक्यात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ – घातपाताचा संशय

यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम गाड्र्या-जामन्या परिसरात निळकंठ कुटियाजवळील कोरड्या तलावात अंदाजे ३० ते ४० वर्षे वयोगटातील अज्ञात महिलेचा अत्यंत कुजलेला मृतदेह १४ एप्रिल रोजी दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मृतदेहाची अवस्था पाहता घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

थोरगव्हाणमध्ये ३७ वर्षीय तरुणाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलीस विविध शक्यता तपासत आहेत. परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून, अज्ञात महिलेचा मृतदेह नेमका कुठून आला आणि तिचा मृत्यू कसा झाला, याचा उलगडा होणं गरजेचं आहे.

– डेली न्यूज यावल

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने