सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबेकर यांचे निधन

भुसावळ प्रतिनिधी :
यावल तालुक्यातील हिंगोणा येथील मूळ रहिवासी तथा सध्या भुसावळ येथील वांजोळा रोड, म्हाडा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबेकर यांचे सोमवार दि. १६ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता अल्प आजाराने दुःखद निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ६२ वर्षे होते.
किशोर आंबेकर यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ५८ वर्षे पोलीस सेवेला वाहून समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या कर्तव्यदक्ष स्वभावामुळे आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे ते पोलीस विभागात तसेच सामाजिक क्षेत्रात परिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भुसावळ व यावल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. १७ रोजी सकाळी ८ वाजता भुसावळ येथील हुडको कॉलनी, वांजोळा रोड येथून अंत्ययात्रा निघून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते भुसावळ येथील पोस्टमन पांडुरंग सापकर यांचे जावई होत. तसेच हिंगोणा येथील पत्रकार हर्षल आंबेकर यांचे चुलत भाऊ होते.

किशोर आंबेकर यांच्या निधनामुळे पोलीस विभागासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने