यावल नगरपालिका : माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेशभाजपच्या उपस्थितीत जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात

यावल (प्रतिनिधी)

यावल शहरातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व माजी नगराध्यक्ष राकेश कोलते तसेच गणेश महाजन यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यांच्या प्रवेशामुळे यावल शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या भव्य प्रवेश सोहळ्यास राज्याचे वस्त्रगृह व उद्योगमंत्री नामदार संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र फडके, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, निवडणूक प्रमुख नंदू महाजन, हिरालाल चौधरी, निवडणूक प्रभारी हर्षल पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, हेमराज फेगडे, तसेच जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

कार्यक्रमास डॉ. कुंदन फेगडे, प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, मंडळाध्यक्ष सागर कोळी, मंडळ सरचिटणीस भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, आर.जी. (नाना) पाटील, अतुल भालेराव, नारायण बापू चौधरी, शहराध्यक्ष राहुल बारी, महिला शहराध्यक्ष नंदाताई महाजन, प्रभाकर आप्पा सोनवणे, नितीन चौधरी, राकेश फेगडे, दीपक अण्णा पाटील, नितीन महाजन आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

भाजप प्रदेश नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावल शहरातील पक्षसंघटना अधिक बळकट होऊन आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपला होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने