यावल तहसील संजय गांधी व कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेत १०७ प्रकरणे मंजुर .

यावल न्युज
 यावल तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून एकूण 65 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून 3 प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. तसेच कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेत 42 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून 2 प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.
या योजनेतील मंजुरी व प्रकरणांचे कामकाज तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. नायब तहसीलदार मनोज खारे, अव्वल कारकून वैशाली पाटील, सकावद तडवी, व्ही. डी. पाटील, महसूल सहाय्यक कांबळे भाऊसाहेब तसेच ऑपरेटर भूषण सोनार यांनी या कामात सक्रिय सहभाग घेत प्रकरण छाननी केलीत 

यावल तहसील कार्यालयाच्या या कार्यामुळे अनेक गरजू नागरिकांना शासनाच्या लाभाचा प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने