यावल न्युज
नुकतेच यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आयोजित करण्यात आले होते मात्र अशा महत्त्वाच्या शिबिराला यावल पंचायत समिती मधील मोजकेच विभाग व दोन चार कर्मचारी वगळता कुठलाही विभाग उपस्थित राहिला नाही त्यामुळे सर्व योजनेचा लाभ एका छता खाली या शिबिराला पायदळी उडवण्याचे काम पंचायत समितीमधील हे मुजोर कर्मचारी करत तर नाही ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे .
या शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी बबन काकडे. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर. गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड. तसेच अनेक विभागातील अधिकारी उपस्थित असताना रावेर यावलचे आमदार अमोल जावळे यांनी घरकुल या संदर्भात प्रश्न उपस्थित केला व या शिबिरात कोण कर्मचारी उपस्थित आहे असे विचारणा केली असता सदर विभागाचे कर्मचारी अनुपस्थित असल्याचे अधिकारी व आमदार महोदयांच्या लक्षात आले
घरकुलाचा प्रश्न उपस्थित होत असताना गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व्यासपीठावर गैर हजर होत्या त्याच वेळी समोर बसलेल्या नागरिकांमधून एक जण उठून यावल पंचायत समितीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांचे फिरवा फीरव होत असल्याची तक्रार आमदार महोदयांना दिली.
सदर घटना लक्षात घेता गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे