यावल तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच पदाची आज आरक्षण सोडत, तहसीलदार यांचे उपस्थितीचे आवाहन

यावल : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायती पैकी ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदा साठीची आरक्षण सोडत आज दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेला येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात सदर आरक्षण सोडत जाहिर केली जाईल. तेव्हा त्या त्या ग्रामपंचायतीतील नागरीकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात एकुण ६७ ग्रामपंचायती आहेत. यातील ४ ग्रामपंचायतीचे आरक्षण या पुर्वीच जाहिर झालेले आहे. तर उवर्रित ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज सोमवारी दिनांक २१ एप्रिल रोजी जाहिर केले जाणार आहे. सातोद रस्त्यावरील तहसिल कार्यालयात दुपारी २ वाजे पासुन आरक्षण सोडत प्रक्रीया प्रांताधिकारी बबन काकडे, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू होईल. यात  एकुण पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. तालुक्यात अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे २१, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे २, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे ३२ असे असुन यातुन अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ४, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ११,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी १ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी १६ असे एकुण ६३ पैकी ३२ जागा महिलांसाठी आरक्षीत केल्या जणार आहे. 
या ग्रामपंचायतीचे निघेल आरक्षण.
भालशिव, सातोद, बोरावल बुद्रुक, चिखली खुर्द, कोळन्हावी, महेलखेडी, मोहरळे, उंटावद, पिंप्री, कोळवद, वढोदे, किनगाव बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, पिळोदे खुर्द, सावखेडेसिम, कोसगाव, चुंचाळे, मारुळ, शिरागड, बामणोद, कासवे, पाडळसे, वड्री खुर्द, साकळी, कासारखेडा, सांगवी खुर्द, नायगाव, विरोदा, आडगाव, न्हावी, गिरडगाव, हंबर्डी, डांभुर्णी, भालोद, शिरसाड, बोरावल खुर्द, दूसखेडा, म्हैसवाडी, चिंचोली, पिळोदे बुद्रुक, कोरपावली, चिखली बुद्रुक, मनवेल, चितोडा, वढोदा प्र.सावदा, राजोरा, अंजाळे, दहिगाव, विरावली बुद्रुक, टाकरखेडा, डोंगरकोठरा, पिंपरूड, किनगाव खुर्द, थोरगव्हाण, आमोदे, वनोली, निमगाव, डोणगाव, सांगवी बुद्रुक, नावरे, हिंगोणे, बोराडे व अट्रावल या गावांचे आरक्षण जाहिर होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने