यावल येथे मा. ना. गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

यावल : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यात तसेच यावल तालुक्यात रक्ताची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. अपघातग्रस्त तसेच प्रसूतीच्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशातून मार्गदर्शक तथा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. कुंदनदादा फेगडे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे रक्तदान शिबिर यावल येथील आई हॉस्पिटल, भुसावळ रोड येथे उत्साहात पार पडले. समाजोपयोगी उपक्रमात डॉ. कुंदनदादा फेगडे व डॉ. जागृती फेगडे यांनी विशेष सहभाग नोंदविला. शिबिरात तब्बल 35 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी भूषण फेगडे, राजेश महाजन, निर्मल चोपडे, व्यंकटेश बारी, मनोज बारी, रितेश बारी, उज्वल कानडे, कोमल इंगळे, सागर इंगळे, राहुल झांबरे, चेतन कोळी, गजानन बारी, शुभम देशमुख, नितीन यादव, सनी बडगुजर, सतीश कोळी, अशोक कोळी, मनोज माळी यांच्यासह मोठ्या संख्येने सहकारी मित्रपरिवार उपस्थित होता.

या शिबिरासाठी रक्त संकलनाचे कार्य संत जगन्नाथ महाराज अंजाळेकर बहुउद्देशीय संस्था, फैजपूर संचालित संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांच्या माध्यमातून करण्यात आले.
रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची ही एक सुंदर संधी ठरली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने