मलेरिया दिनानिमित्त किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मार्फत जनजागृती मोहीम

यावल : तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्रांमध्ये २५ एप्रिल रोजी मलेरिया दिन जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी एम.एम. पाटील यांच्या सुचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु तडवी, पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमात डॉ. दर्शना जयवंतराव निकम व डॉ. तरन्नुम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. मालोद, आडगाव, नायगाव, चिंचोली व डांभूर्णी या उपकेंद्रांमध्ये मलेरिया दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी आरोग्य निरीक्षक दीक्षांत प्रधान, प्रयोगशाळा वैज्ञानिक सतीश सोनवणे, आरोग्य सेवक पवन काळे (पाटील), मनोज बारेला, उमर रजा, पी.एन. कोल्हे आदींनी सहभाग घेतला. नागरिकांना मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया या डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी माहिती देण्यात आली.

स्वच्छता राखणे, उघड्यावर पाणी साचू न देणे, मच्छरदाणी वापरणे, पूर्ण कपडे घालणे आणि कीटकनाशक फवारणी यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने