जळगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. ०७/०८/२०२६, शुक्रवार रोजी दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यामध्ये ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.
या मार्गदर्शन व चर्चासत्रासाठी सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.